Pune Election : पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीत भाजपची बैठक, दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती उपस्थित

Continues below advertisement

पुण्यात कसबा (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका (Bypoll election) जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. यात त्यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळकांनी देखील  घरातच उमेदवारी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शैलेश टिळक (Shailesh Tilak) राजकारणात फारसे सक्रिय नाहीत त्यामुळे मुक्ता टिळकांचा मुलगा कुणाल टिळकची (Kunal Tilak) सध्या चर्चा रंगली आहे. 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram