#PuneRains पुण्यातल्या मंडईचं मोठं नुकसान, पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरल्यानं मोठा आर्थिक फटका
गेल्या पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. यावेळी ग्रामीण भागांसह शहरी भागातही पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक भागांत काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं आहे. तर काही भागांत वीजपुरवठाही बंद आहे. काही भागांत साचलेलं पाणी घरांत जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Tags :
Pune Heavy Rain Pune Rainfall Heavy Rain In Pune Micky Ghai Monsoon Update Heavy Rains Pune Rain