Bhima Koregaon 1 January Preparation : शौर्यदिनाची जोरदार तयारी, 6500 पोलिसांचा फौजफाटा ABP Majha

Bhima Koregaon 1 January Preparation : शौर्यदिनाची जोरदार तयारी, 6500 पोलिसांचा फौजफाटा ABP Majha

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारीला रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंबंधी पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. 1 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला 10-12 लाख भीम अनुयायी उपस्थित राहतील असा अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी पी एम पी एलच्या 350 हून आधी बसेस उपलब्ध असतील तर नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय केली असून वैद्यकीय कक्ष देखील उभारण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने 6500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सी सी टिव्ही द्वारे देखील नजर ठेवण्यात येईल. तसेच वाहतुकीसाठी या परिसरातील रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola