Baramati Rain : सुशोभीकरणावर लाखो खर्च, पहिल्याच पावसात बारामतीत रस्ते तुंबले ABP Majha

Continues below advertisement

 मुंबई : आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी (Monsoon News)  आनंदाची बातमी आहे. येत्या 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार आहे.   आजपासून पुढील तीन दिवस तूफान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज  हवामान खात्याने व्यक्त केला आहे.तर  मुंबईत 4-5 जून पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सीन वेळेअगोदरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून वेळेअगोदरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  सध्या नैऋत्य मोसमी वारे हे दक्षिण कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. 
 मागील काही दिवसांपासून मुंबई तसेच उपनगरांत उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दरम्यान मुंबईत कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर, ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या पवासचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर,  सातारा, अहमदनगर, बीड आणि जालना भागात  वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. 

कसे असणार मुंबईचे हवामान?

सोमवारी मुंबईत तापमान 33 ते 35 अंशादरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर ठाणे, पालघर भागात उष्ण आणि दमट वातावरण असणार आहे. नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram