Baramati : Ankita Thackeray यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर, बारामतीत जोरदार चर्चा
Baramati : Ankita Thackeray यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर, बारामतीत जोरदार चर्चा
सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूर मध्ये भावी खासदार असा उल्लेख केलेला बॅनर्स झळकले आहेत.अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. अंकिता पाटील या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा आहेत. इंदापुरातील आय कॉलेज समोर अंकिता पाटील यांचे भावी खासदार असा उल्लेख केलेला फ्लेक्स लावला आहे. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.