Pune : ससून रुग्णालयातून बाळ पळवलं, आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात; 3 महिन्याच्या बाळाची सुटका
Continues below advertisement
पुण्याच्या ससून रुग्णालयात नर्सच्या वेशभूषेत आलेल्या एका महिलेने तीन महिन्याचं बाळ पळवून नेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. दरम्यान हा प्रकार समजताच, सतर्कता दाखवत नागरिकांनी आणि पोलिसांनी महिलेचा पाठलाग करून बाळाची सुखरूप सुटका केलीय. या प्रकरणी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Continues below advertisement