Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

Continues below advertisement

Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले, बाबूराव चंदेरे यांचा पलटवार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत. चांदेरे  (Baburao Chandere) यांनी पुण्यात एका काल (शनिवारी, ता 25) नागरिकाला मारहाण केल्याची माहिती संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती, त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबुराव चांदेरे (Baburao Chandere) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वारंवार मारहाण आणि शिवीगाळ या घटनामुळे बाबुराव चांदेरे  (Baburao Chandere) चर्चेत येतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram