Ashwini Jagtap Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार आश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस
Continues below advertisement
Ashwini Jagtap Chinchwad Bypoll Election : भाजप उमेदवार आश्विनी जगताप यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस
चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस
२०१९ च्या निवडणुकीत चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहे.
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये आचारसंहिता भंगाच्या आलेल्या दहा तक्रारींवर कारवाई करण्यात आली असून, भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे. या मतदार संघातील पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून सुमारे ४३ लाख रूपयांची रोकड, चार लाख ९७ हजार ६२५ रुपये किमतीचे मद्य आणि ९४ हजार ७५० रुपयांचा ३ किलो ५८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
Continues below advertisement