Pune School : पुण्यातील आरटीईच्या 15 हजार 655 जागांसाठी 11 हजार 550 विद्यार्थ्यांचे अर्ज
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण जागांच्या तिपटीहून अधिक अर्ज आलेत. राज्यातील १ लाख १ हजार ९६९ जागांसाठी तीन लाख ६५ हजाराहून अधिक अर्ज आलेत. पुढील आठवडय़ात प्रत्येक जिल्ह्य़ात लॉटरी पद्धतीने 25 टक्के विद्यार्थ्यांची निवड करणार आहे.