गृहमंत्री अनिल देशमुख पुण्याच्या 'सुप्पर आजीच्या' भेटीला, दिली एक लाखांची मदत

Continues below advertisement
पुणे : सोशल मीडियावर जर तुम्ही अॅक्टिव्ह असाल तर सफाईदारपणे लाठ्याकाठ्या फिरवत असलेल्या आजीबाईंचा व्हिडीओ तुमच्या नजरेस नक्कीच पडल्या असतील. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं या व्हिडीओमध्ये सांगितलं जात आहे. या आजीचं वय 85 वर्षे असून शांताबाई पवार असं त्यांचं नाव आहे. पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात. या वयातही ज्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आज या आजीची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram