Amitesh Kumar on Pune Car Accident : दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले- अमितेश कुमार

Continues below advertisement

Amitesh Kumar on Pune Car Accident : दुर्दैवाने कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.पुण्यात (Pune News)  भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या  अल्पवयीन मुलांला  15 तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी (Pune Police)  चुकीचा तपास केला, पैशांची सेटलमेंट केली असा आरोप विरोधकांकडून  करण्यात आला त्यानंतर हे प्रकरण चांगले  तापले. आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत.  काल  देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis)  कारवाईच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी 24 तासात या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली  आहे.  

पुण्यात भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या मुलाचे वडील आणि बांधकाम व्यायवसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलीय. जी.एम प्लाझा लॉजिंग अँड रेस्टॉरंटमधून पुण्याचे उद्योजक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आलीये. विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे.  तर दुसरीकडे अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram