Amit Shah Daura : अमित शाह आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पुणे, कोल्हापूरलाही भेट देणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शाह यांचा हा दौरा १७, १८ आणि १९ फेब्रुवारी दरम्यान असणार आहे. आज रात्री ते नागपुरात दाखल होतील. भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणारेय. रात्री आठ वाजता ते नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून फुटाळा तलावात साकारलेल्या लाईट आणि लेझर शो पाहण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्ताने नागपुरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. दरम्यान, शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यात पुणे आणि कोल्हापूरलाही भेट देणार आहेत.