Pune Alcohol Sell : पुणेकरांचा हिवाळा झिंगाट! थंडीबरोबर दारूची विक्रीसुद्धा वाढली
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हिवाळ्यात पडलेल्या थंडी ने नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात दारूच्या विक्रीत मोठी वाढ झालीये. देशी दारूची विक्री ३.७ टक्क्यांनी तर विदेशी दारूची विक्री ४.२ टक्क्यांनी वाढली आहे. बिअरच्या विक्रीत थेट १६.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाईनच्या विक्रीतही ११.४ टक्के वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडे या नोंदी करण्यात आल्या आहात. हिवाळ्यात मद्यपानाचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळते.