Kartiki Ekadashi Alandi Temple : संत तुकाराम महाराज मंदिर सजलं, आकर्षक फुलांची सजावट : ABP Majha
Continues below advertisement
संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला कार्तिकी एकादशी तसेच ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळयानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी देहूचं मुख्य मंदिर, गाभारा,दरवळून निघाला आहे..आज देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांना तुकोबांच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. आळंदी येथून आज लाखो वारकरी देहु नगरीत संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फुलांच्या या सजावटीची पर्वणी मिळाली.
Continues below advertisement