Ajit Pawar | 'ते तिथं गेले आणि....'; पक्ष सोडून गेलेल्यांना अजित पवार यांच्या कानपिचक्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच या राजकीय वर्तुळातील अनोख्या अंदाजामुळं चर्चेत असतात. कधी ते कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून येतात, कधी जनता दरबारात आलेल्या प्रत्येकाची भेट घेतात तर कधी पत्रकारांशी गप्पाही मारतात. अशा या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजित पवार यांचा असाच एक अंदाज नुकताच पाहायला मिळाला. कारण, अजितदादांनी त्यांच्याच शैलीत राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्या लोकांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. इंदापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी पक्षाला रामराम ठोकणाऱ्यांचा मिश्कील अंदाजात समाचार घेतला.

'काहीजणांना सवय असते. ज्यांची सत्ता त्यांच्याकडे ते पळतात. पण, पक्षातून ते गेल्यामुळं त्यांचं सरकार गेलं आणि आमचं आलं. त्यामुळं असं जित्राबं नकोच', असं ते म्हणाले. सभास्थळी उपस्थित असणाऱ्यांना उद्देशून येत्या काळात आपण तरुणांची टीम तयार करु, फक्त निर्व्यसनी राहा चांगली कामं करा असा संदेशही त्यांनी दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola