Ajit Pawar Resigns : पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांच्याकडून राजीनामा
अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदामुळे वाढलेला व्याप पाहता अजितदादांनी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष संघटना आणि सरकारमधील जबाबदाऱ्यांना अधिक वेळ देता यासाठी अजित पवारांनी हा राजीनामा दिलाय. अजित पवार गेली 32 वर्षे या बँकेचे संचालक होते.