Ajit Pawar On Farmer : शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवारांची मुख्यमंत्र्यावर टीका : ABP Majha
पूरग्रस्तांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली. शिंदे सरकार शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत उदासिन असल्याची टीकाही त्यांनी केली. तर १०० टक्के पंचनामे झाले असून नियमापेक्षा अधिक मदत देऊ, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात दिली.