Ajit Pawar on Eknath Shinde : काही भाषणं फारचं लांबली, अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला ABP Majha
Ajit Pawar : मी दसरा मेळाव्यात झालेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांचीही भाषणे ऐकली. मात्र, काहींची भाषणं नको तितकी लांबली असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. आता शिवसैनिकांनी निर्णय घ्यायला हवा. आपली पुढची भूमिका काय असायला हवी. कोणाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे, कोणाची मुळ शिवसेना आहे, याबाबत विचार करावा असेही अजित पवार म्हणाले.