Ajit Pawar Baramati : राष्ट्रवादीतल्या बंडानंतर पहिल्यांदाच अजितदादा बारामतीमध्ये येणार

सध्या महाराष्ट्राचं राजकारण बारामतीभोवती घिरट्या घालू लागलंय. तसंच काल शरद पवारही राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आज येणारेत. दोन महिन्यांनंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत येणार आहेत.. दर शनिवारी किंवा रविवारी बारामतीत जनता दरबार घेणारे अजित पवार राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर बारामतीत आलेच नाहीत.  त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी तयारीही करण्यात आलीये. तसंच अजित पवार आज शक्तीप्रदर्शनही करणार आहेत. तसंच कारभारी चौक ते शारदा प्रांगण या दरम्यान अजित पवार भव्य अशी रॅलीही काढणार आहे. रॅलीनंतर शारदा प्रांगण येथे अजित पवार सभा घेणार आहेत यात काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola