पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामावरुन Ajit Pawar यांनी अधिकारी-ठेकेदाराला खडसावलं

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सडेतोड आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामाचा आढावा घेताना कामाच्या दर्जावरुन अजित पवार चांगलेच भडकले. अधिकारी आणि कंत्राटदाराला त्यांनी धारेवर धरलं. यानंतर पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा घेताना अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत कामाच्या दर्जावर अजित पवार संतापले. "गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे 'छा-छू' काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?" असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola