Ajit Pawar Pune : अजितदादांचा नेम, कुणाचा झाला गेम? अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) कात्रजचा घाट दाखवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नाराज असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यामुळे नाराज अजित पवार पुन्हा एकदा कोणता मोठा निर्णय घेणार का? इथपर्यंत ही चर्चा जाऊन पोहोचली होती. मात्र, आता या नाराजीचा सर्व उलगडा आज ( 4 ऑक्टोबर) एका क्षणामध्ये झाला आहे. राज्यातील सुधारित पालकमंत्री (New Guardian Ministers) जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram