Ajit Pawar : 'आम्ही येऊन दारुभट्ट्या शोधतो, पोलीस निवांत पगार घेतील'; अजित पवारांची पोलिसांवर नाराजी
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सेल्युटच करतो अशा सुरात भर सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवैद्य दारू धंदे बंद होत नसल्याबाबत पोलीस प्रशासनाला सुनावले.. बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करत असताना गावातील दारूबंद करण्याबाबत अजित पवारांकडे निवेदन दिले. भर सभेत दिलेले निवेदन वाचत पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, असा नारा देत आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो. आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सेल्युटच करतो.. असे म्हणत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.