Pune | सारथी कार्यालयाबाहेर सहा दिवसांपासून तारादूतांचं आंदोलन सुरू, खासदार संभाजीराजेंकडून भेट
खासदार संभाजी छत्रपती यांनी पुण्यातील सारथी संस्थेसमोर मागील सहा दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या तारादूतांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चालवण्यासाठी सारथी संस्था टीकवली पाहिजे असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. आज शरद पवारांचा वाढदिवस आहे आणि शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असल्याने त्यांनी या तारादूतांची समस्या सोडवावी अशी अपेक्षाही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.