Lonavla Cycle Rally | लोणावळ्यात भव्य सायकल रॅलीचं आयोजन
पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लोणावळ्यात आठवड्यातून एक दिवस 'सायकल डे'चा उपक्रम राबविला जाणार आहे. सिने अभिनेते सुनील शेट्टीच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा झालाय. वाहतूक कोंडीमुळं शहरात प्रदूषण वाढतंय, अशीच परिस्थिती कायम राहिली तर इथल्या वैभवाला धक्का बसण्याची शक्यता आहे. परिणामी आर्थिक घडी बिघडणार हे उघड आहे. यावर तोडगा म्हणून या कौतुकास्पद उपक्रमाची सुरुवात करण्यात आलीये.