Pune Hording collapse : पुण्यात अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरु, चार जणांवर गुन्हा दाखल
Pune Hording collapse : पिंपरी चिंचवडमधील होर्डिंग किवळ्यात कोसळले. या दुर्घटनेत पाच जण दगावले आणि चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. ते नव्यानं कारवाईला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या फलक धोरणाची यापुढील काळात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने घेतला आहे. त्यानुसार आता अनाधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे.