Pune Accident : पुण्यात नवले पुलाजवळ केमिकल टँकरचा भीषण अपघात, 2 जणांचा मृत्यू तर 12 लोक जखमी

पुणे बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ आज पुन्हा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून, या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरने समोरील 15 ते 16 वाहनांना उडवत फरफटत नेले असून, घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बेंगलोरकडून पुण्याकडे येत असलेल्या थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरचे या उतारावर आल्यानंतर नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील वाहनांना उडविण्यास सुरुवात केली. टँकरने जवळपास 15 ते 16 वाहनांना उडवले. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे, तर 12 ते 13 लोक जखमी झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola