Pune : पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर जवळ भीषण अपघात, चार जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर इथे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले असे असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तीन वाहनांचा हा विचित्र अपघात झाला. अपघातातील जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. भरधाव वेगाने नगरच्या दिशेने जाणारा ट्रक दुभाजकला धडकून विरुद्ध बाजूला पलटी झाला त्यावेळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि दोन टू व्हीलर गाड्यांना ट्रकने जोरदार धडक दिली अशी प्राथमिक माहिती आहे. 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola