Aam Aadmi Party : आम आदमी पक्ष कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढवणार
आम आदमी पक्ष कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक लढवणार असून, दोन्ही मतदार संघासाठी आपकडून नऊ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यायत. दरम्यान, आपचे प्रभारी गोपाळ इटालिया पुण्यात तळ ठोकून बसले असून, आज संध्याकाळी आपकडून उमेदवारीबाबत घोषणा केली जाणारेय.