Pune School : पुणे जिल्ह्यात ४३ शाळा अनधिकृत, जिल्हा शिक्षण विभागाची माहिती
पुणे जिल्ह्यात ४३ अनधिकृत शाळा असल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला आढळलं होतं. त्यापैकी १३ शाळांच्या व्यवस्थापक आणि मुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. तर उरलेल्या 30 शाळा बंद करण्यात येणार आहेत. बंद करण्यात येणाऱ्या ३० शाळांपैकी काही शाळा त्यांच्या अधिकृत पत्यावर भरत नव्हत्या. त्या शाळा आता अधिकृत पत्यावर भरत असल्याने आधी ज्या जागी शाळा भरत होत्या ती अनधिकृत समजण्यात आलीय...