Pune Baby Found | चार महिन्यांच्या 'त्या' चिमुरडीची आई अखेर सापडली

Continues below advertisement
पुणे : पुण्यातील बावधन परिसरात चार महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काल दुपारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. माध्यमात बातमी आल्यानंतर अखेर सायंकाळी या बाळाच्या कुटुंबियांचा शोध अखेर लागला. सध्या ही मुलगी वडिलांच्या ताब्यात असून तिची आई मात्र बेपत्ता होती. ही आई देखील आता सापडली आहे.  मानसिक ताणतणावातून हे कृत्य केले असल्याचे समोर आले आहे. तसंच रात्रभर ही चिमुरडी वारजे पुलाखाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram