Ganeshotsav : कसबा गणपती घराघरात विराजमान होणार! गणेश मंडळातर्फे भाविकांना 251 गणेशाची मूर्ती प्रदान

पुणे : बाप्पांच्या आगमनाचे वेध आपल्या सगळ्यांना लागले आहेत. 'श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळ' नेहमीप्रमाणेच यावर्षी देखील नावीन्यपूर्ण रूपात गणेशोत्सव साजरा करणार आहे. सध्याची परिस्थिती बघता गर्दी न करता उत्सव साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनाच श्री गणेशाचे उत्सव मंडपात येऊन दर्शन घेणे शक्य होणार नाही. उत्सव मंडपात जरी येता आले नाही तरी श्रींच्या आराधनेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी यावर्षी पुन्हा एकदा 'श्री कसबा गणपती गणेशोत्सव मंडळा'तर्फे श्रींची वीरासनातील मूर्ती काही भाविकांना प्रदान केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola