Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, शाईफेकप्रकरणी 2 जणांना अटक
Continues below advertisement
महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरी दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आलीय. शाईफेकप्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना आणि वंचित बहुजन आघाडीच्या सचिवांना अटक करण्यात आलीये. दरम्यान या घटनेपूर्वी चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवून ताफा अडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. त्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या घरी असताना त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली. मनोज भरबडे याने दोन साथीदारांसह चंद्रकांत पाटलांवर शाईफेक केलीय.. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता
Continues below advertisement