12th Board Exam 2023 : बारावीची लेखी परीक्षा, 100 मीटर अंतरापर्यंत झेरॉक्सची दुकानं बंद
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उद्यापासून सुरु होणारी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. पण उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावर्षी राज्यात १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्यात मुलींची संख्या सहा लाख ६४ हजार ४६१ असून, मुलांची संख्या सात लाख ९२ हजार ७५० आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. राज्यातल्या तीन हजार १९५ मुख्य केंद्रांवर बारावीची लेखी परीक्षा होईल. प्रत्येक परीक्षा केंद्रापासून ५० मीटर अंतरापर्यंत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणालाही फिरायला परवानगी नाही. तसंच परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत झेरॉक्सची दुकानं बंद असणार आहे.