Property Purchase Rate : रेडी रेकनर वाढला, मालमत्ता खरेदी महागली; सरासरी 4.39 टक्के वाढ
Property Purchase Rate : रेडी रेकनर वाढला, मालमत्ता खरेदी महागली; सरासरी 4.39 टक्के वाढ
Ready Reckoner Rate : राज्यातील रेडी रेकनरच्या दरात सरासरी 4.39 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार आहे. गेली तीन वर्षे रेडी रेकनरच्या दरात राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाकडून कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र यावेळी मात्र राज्यातील सर्वच विभागांत रेडी रेकनरचे दर वाढवण्यात आले असून आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरी भागात ही वाढ 5.95 टक्के तर ग्रामीण भागात ही वाढ 3.36 टक्के असणार आहे.
कोरोना महामारीचा मालमत्ता बाजारपेठेवर परिणाम झाल्याने राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत रेडी रेकनरच्या दराची फेररचना केली नव्हती. सध्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातच राज्य सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसुलाची अपेक्षा आहे. आता रेडी रेकनरच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये 6.26 टक्के, कल्याण- डोंबिवलीत 5.84 टक्के, नवी मुंबईत 6.75 टक्के, पुण्यात 4,16 टक्के, नाशिकमध्ये 7, 31 टक्के अशी वाढ जाहीर करण्यात आली आहे.