Farmer Protest | सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी तयार, पंतप्रधान मोदींचं सर्वपक्षीय बैठकीत आश्वासन
Continues below advertisement
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. यात सरकार शेतकऱ्यांशी चर्च करण्यास तयार असून चर्चेतूनच मार्ग निघणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की चर्चेदरम्यान सरकारने दिलेली ऑफर अद्याप कायम आहे.
शेतकऱ्यांची इच्छा असेल तर चर्चा करू - पंतप्रधान मोदी
सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाच्या वतीने राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. पीएम मोदी म्हणाले की सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. कृषी कायद्यावर, आम्ही फक्त एक फोन कॉल दूर आहोत. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर चर्चा करायला सरकार तयार आहे.
Continues below advertisement
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest PM Modi