Pandharpur Hospital Sealed | प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल महिलेला कोरोना, रुग्णालयातील 47 जणांचा स्टाफ क्वॉरंटाईन
Continues below advertisement
पंढरपुरातील रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे पंढरपुरातील संबंधित रुग्णालय सील करण्यात आलं आहे. या महिलेची 23 एप्रिलला प्रसूती झाली. तिने जुळ्यांना जन्म दिला, मात्र त्यातील एका बाळाचा मृत्यू झाला. प्रसूतीनंतर झालेल्या चाचणीत ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. या रुग्णालयातल्या 10 डॉक्टरांसह 47 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement