Pravin Darekar | मुंबईतील खासगी रुग्णालये लुटमारीची केंद्र, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा आरोप
Continues below advertisement
कोरोनाच्या नावाखाली अनेक खाजगी रुग्णालये लुटमारीची केंद्रे झाली आहेत, असा घणाघाती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या लुटमारीचा फटका दुसरं तिसरं कुणी नाही तर स्वतः दरेकर यांच्याच कुटुंबियांना बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुर्ल्यातील कोहिनूर रुग्णालयात प्रविण दरेकर यांच्या काकांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरी तब्बल 17 लाखांचं बिल त्यांच्या कुटुंबियांना आकारण्यात आलं. हे कळताच प्रविण दरेकर यांनी भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेवक हरीश भांडीर्गे आणि वरिष्ठ पोलीस निक्षसकांसह रुग्णालयात धाव घेतली आणि व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली.
Continues below advertisement
Tags :
Corona Bill Private Hospital Bills Thane Corona Private Hospitals Pravin Darekar Corona In Mumbai Mumbai