Prashna Maharashtrache येत्या आठवडाभरात मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो- प्रकाश आंबेडकर

मुंबई : राज्यातील मंदिरांमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. राज्यातील मंदिरं खुली झाली तर मोठा महसूल राज्य सरकारला मिळेल. सरकारसोबत चर्चा सुरु आहे. मंदिरं खुली करण्यासाठीची नियमावली आखण्याचं काम सरकार करत आहे. येत्या आठवडाभरात मंदिर खुली करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola