Praniti Shinde Exclusive : आई-वडिलांच्या पराभवाचा बदला, विजयानंतर प्रणिती शिंदे EXCLUSIVE

Praniti Shinde Exclusive : आई-वडिलांच्या पराभवाचा बदला, विजयानंतर प्रणिती शिंदे EXCLUSIVE पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा

 

Baramati : अजित पवारांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवारांचा घात, सहापैकी 5 ठिकाणी सुप्रिया सुळेंना साथ, कुणाला किती मतं?

 राज्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवांरांचा पराभव केला. शरद पवार विरुद्ध अजित पवार (Sharad Pawar Vs Ajit Pawar) यांच्या लढतीत बारामती कुणाची याचा फैसला बारामतीकरांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election Result) सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी मोठं मताधिक्य घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, अजित पवार ज्या बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी 47 हजाराहून जास्त मतधिक्य घेतलं आहे. अजित पवारांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जातेय.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार नवीन चिन्ह तुतारीसह निवडणुकीला सामोरं गेले. त्यातच अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात थेट त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच उतरवलं. मात्र अजित पवारांचा हा निर्णय पवार कुटुंबीयांसह बारामतीकरांनाही पटला नसल्याचं आता निकालातून दिसलं. सर्व नेते अजित पवारांसोबत, पण जनता मात्र शऱद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola