Prakash Ambedkar #Lockdown लॉकडाऊनपेक्षा नियंत्रणावर भर द्या - प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. लॉकडाऊनपेक्षा सरकारनं नियंत्रणावर भर देण्याची विनंती यावेळी आंबेडकरांनी सरकारला केली आहे. अकोल्यामध्ये ते बोलत होते.
दरम्यान, अमरावतीमधील रुग्णवाढीच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक आरोप केला आहे. येथील अनेक रुग्ण विम्याच्या पैशांसाठी कोरोना पॉझिटिव्ह दाखवत असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. सरकारनं अमरावतीमधील वाढत्या रुग्णसंख्येची चौकशी करण्याची मागणी यावेळी आंबेडकरांनी केली आहे.
Continues below advertisement