Pooja Chavan Suicide Case : संजय राठोडांच्या समर्थनार्थ मोर्चा, काय म्हणाले मोर्चेकरी?

Continues below advertisement

मुंबई : संजय राठोड प्रकरणी शिवसेनेनं 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका घेतली आहे. पोलिसांचा रिपोर्ट येईपर्यत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच संजय राठोडांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याची देखील माहिती आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर शिवसेनेत गहन चर्चा सुरु आहे. राजीनाम्याच्या प्रश्नावर पक्षात दोन मतप्रवाह आहे. राजीनामा देण म्हणजे आरोप मान्य करण्यासारखी गोष्ट असल्याचं राजीनाम्याला विरोध करणाऱ्या गटाचं मत आहे. संजय राठोड प्रकरणातून चुकीचा पायंडा पडू नये असं मत अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलंय. राजीनाम्याच्या प्रश्नावर अद्यापही कुणाकडेच ठोस माहिती नाही हे मात्र नक्की.

शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन दोन गट
शिवसेनेत संजय राठोड यांच्यावरुन घेऊन दोन गट पडल्याचे दिसते आहे. मात्र आधीपासूनच संजय राठोड हे एकनाथ शिंदे गटाचे. दुसरीकडे त्यांच्या विरोधात सेनेच्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळ जिल्ह्यातील बाजोरिया, देशमुख यांच्यासारखे नेते. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा का? संजय राठोड यांनी मीडियासमोर येऊ नये. संजय राठोड आणि परिवाराने नक्की कुठे राहावे? संजय राठोड यांच्याकडून उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली त्यातील महत्वाचा दुआ, असे बरेच 'निर्णय', 'आदेश' किंवा 'सल्ले' देण्यात आले आहेत. त्यात परवा शिवसेनेची बैठक झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram