तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवा, युवासेनेची मागणी
शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी तहानभूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत... आणि अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत...'तेजस ठाकरे यांना राजकीय मैदनात उतरवावे' अशी मागणी युवासेनेनं उद्धव ठाकरेंकडे केली आहे... युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे... त्यामुळे आजवर... जंगलात, दऱ्या खोऱ्यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्या शड्डू ठोकणार का हे पाहावं लागणार आहे...