ABP News

बापाने कष्ट उपसले आता आम्हीही तेच करायचं का? सरकार शेतकऱ्यांच्या पोरांना वाऱ्यावर सोडतंय का?

Continues below advertisement

विधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देणं ही काही कोणाची दया नाही, तो स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमध्ये झालेला समझोता आहे. आता केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचं हे राष्ट्रवादीनं ठरवायचं असं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही राजू शेट्टींनी राष्ट्रवादीला दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असंही ते म्हणाले. 

पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी देखील राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं तर सरकारला महागात पडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, जिथं महाविकास आघाडी सरकार चुकतंय तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाली नाही असा राज्य सरकारला घरचा आहेर राजू शेट्टींनी या आधीच दिला होता. 

यावर युवा  स्वाभिमान शेतकरी संघटनेने ABP Majha शी संवाद साधला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram