Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामती येथे येत होते. त्यावेळी गोजुबावी गावाजवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात अजित पवार, वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता. दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाले असतानाही चौकशीचा अहवाल अद्याप समोर न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
युगेंद्र पवार म्हणाले की, "अजित दादांना जाऊन सहा महिने होत आहेत. सहा महिने कसे गेले हे कळलेच नाही. पहिल्या दिवसापासून आमच्या सगळ्यांची मागणी आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाचा पहिल्या महिन्याभरात प्राथमिक अहवाल आला, पण तो आम्हाला पटलेला नाही. त्यात अनेक मुद्दे चुकीचे आहेत."