ABP News

Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!

Continues below advertisement

मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या मंत्र्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी सत्ताधारी आमदारांकडून विधानसभेत करण्यात आली. त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या (Disha Salian Case) वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांचा हत्याप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आरोपांनंतर भाजपच्या आमदारांनी अपेक्षेप्रमाणे आज सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत थेट आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली. 

यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करु, असे योगेश कदम यांनी म्हटले. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उभे राहत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशाप्रकरणात ज्या संबंधित व्यक्तीवर आरोप होतो, त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करावी लागते. काल सतीश सालियन यांनी मविआच्या काळातील मंत्र्यावर आरोप केले. त्यामुळे त्या नेत्याला सामान्य व्यक्तीप्रमाणे न्याय लावावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. नितेश राणे यांच्या या मागणीला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी समर्थन दिले. नितेश राणे म्हणता त्याप्रकारे सामान्य माणसाला जो न्याय लागतो, तोच नियम माजी मंत्र्याला लावला पाहिजे. त्यामुळे मंत्रिमहोदयांनी आरोपीला तात्काळ अटक करुन चौकशी करावी, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले. त्यामुळे आता गृहखात्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर काही कठोर कारवाई होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram