होय मी नाराज आहे, मात्र मंत्रिपदासाठी नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिपद नसल्याने दु:ख-दीपक केसरकर
Continues below advertisement
नारायण राणे आणि शिवसेना वाद सुरू असतानाच त्यात खुद्द माजी गृहराज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी उडी घेतली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टिका राणेंनी केली ती म्हणजे पहीलीतील पुस्तकातील उंदराच्या "ढुम-ढुम-ढुमाक" या गोष्टीसारखी आहे.राजाने टोपी घेतली, तर राजा भिकारी आणि टोपी दिली तर राजा मला भ्याला असे बोलण्यासारखे त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या विरोधात मी आजही तितक्याच तिडकीने लढा देईन. छोट्या बरोबर मोठ्या नरकासूराचा वध करायलाच पाहीजे,त्यासाठी श्रीकृष्ण कोणाच्यातरी रुपाने येतोच,तो माझ्या रुपाने का असेना,अशीही टिका दीपक केसरकर यांनी केली.
Continues below advertisement