Yashwant Jadhav Raid: 41 मालमत्ता आयकर खात्याकडून जप्त, वांद्रे परिसरातील ५ कोटींचा फ्लॅट देखील जप्त
शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 41 मालमत्ता आयकर खात्यानं जप्त केल्या आहेत. यात वांद्रे पश्चिम परिसरातील एका इमारतीतील ५ कोटींचा फ्लॅट देखील जप्त केल्याची माहिती आहे. 25 फेब्रुवारी रोजी आयटी विभागाकडून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरु करण्यात आली होती. यात 3 दिवस ही छापेमारी चालली. अशात काही कागदपत्र गोळा करण्यात आली होती. यातूनच हा फ्लॅट देखील असल्याचं समोर आलंय. वांद्र्यातील या इमारतीसमोरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.