Tejas Thackeray in Politics : तेजस ठाकरे राजकारणात येणार? राजकारणात 'तेजो'दय होणार?

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधील जाहिरात प्रकाशित करुन आणि नंतर सूचक ट्विट करुन राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधलंय. ती जाहिरात आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाची. नार्वेकरांच्या ट्विटचा आणि सकाळच्या सामनातील जाहिरातीचा मजकूर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस तेजस ठाकरे असा उल्लेख सामनातील जाहिरातीत करण्यात आलाय. तर एक घाव, दोन तुकडे असा उल्लेख नार्वेकरांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलाय. त्यामुळे महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्या आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. ठाकरे आणि आक्रमकपणा हे समीकरणही तसं जुनंच. पण शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अशी जाहिरात दिल्यानं आणि ट्विट केल्यानं तेजस ठाकरेंची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola