Sceptre in new Parliament : नव्या संसदेत राजदंड स्थापित करणार : ABP Majha
Continues below advertisement
दक्षिणेतल्या चोल राजघराण्याचा राजदंड नव्या संसदेमध्ये स्थापित केला जाणार आहे. निष्पक्ष राज्यकारभाराचं प्रतीक म्हणून हा राजदंड स्थापित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.. ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्ता हस्तांतरित केली जात असताना हाच राजदंड पंडित नेहरूंना देण्य़ात आला होता.. सत्तेचं हस्तांतरण कसं व्हावं याबाबत विचार झाल्यानंतर सी. राजगोपालचारी यांनी ही कल्पना सुचवली होती. हा राजदंड इतके दिवस अलाहाबादच्या संग्रहालयात होता, तो आता संसदेत स्थापन केला जाणार आहे.
Continues below advertisement