Mahesh Ahir प्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर कारवाई होणार? 4 आरोपी पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार?
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश अहीर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी चार जणांना अटक झालीये... मात्र आरोपी नंबर एक असलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अटक केलेली नसून आज कारवाई होण्याची शक्यता आहे... तर आव्हाडदेखील आज अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करणार आहेत... दरम्यान आज चारही आरोपींना पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे...